मेलीली जनावरे रोडवर पडलेला कचरा नगर परिषद मध्ये आणुन टाकण्याचा सावता काळे यांचा ईशारा
रेणुका नगर बि एस एन एल जवळ मरण पावलेली जनावरे टाकले जात असल्याने परिसरात दुर्गेर्धी पसरून नागरिंकाना त्रास .
प्रतिनिधी परतूर : हनुमंत दवंडे
रेणुका नगर,ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल व सीतानंद नगर BSNL जवळ परिसरातील नागरिकांना गेल्या ३० वर्षांपासून घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे.नगर परिषद शहरातील मेलेली जनावरे व कचरा या ठिकाणी टाकत असून त्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी, पसरून
डेंगू मलेरिया सारख्या रोगराई पसरून नागरिकाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर नगर परिषद ने तात्काळ उपाय योजना करावी नसता मरण पावलेली जणावर व रस्तावर पडलेला कचरा नगर परिषद दालनात टाकण्याचा ईशारा सावता काळे यांणी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिला आहे
नवरात्र उत्सवाच्या काळातही रेणुका नगरातील माता-भगिनींना या घाणीचा सामना करावा लागत असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका संघटन सरचिटणीस सावता सुभाषराव काळे, भाजपाचे अनुसूचित जाती-जमाती शहराध्यक्ष नरेशजी कांबळे व शहर संघटन सरचिटणीस आनंदजी कोटेचा,पवनजी मोर,अमोलजी अग्रवाल,अमरजी बगडिया,मनोजजी मसलकर व स्थानिक नागरिक आशिषजी धुमाळ,धुमाळ काका,सुनिलजी कोंडावर यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेच्या बेजबाबदार कारभारावर जोरदार टीका केली.“गेल्या ३० वर्षांपासून या ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. नगरपरिषदेने तात्काळ उपाययोजना न केल्यास आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे मेलेली जनावरे व कचरा थेट नगरपरिषदेच्या दारात टाकू,” असा इशारा सावता काळे यांनी दिला.
स्थानिक नागरिकांनी देखील नगरपरिषदेकडून स्वच्छतेबाबत कायमची उपाययोजना करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.









