कसलंही संकट असो…मी तुमच्यासोबत आहे, कुठली अडचण आली तर मला तात्काळ सांगा” आपत्ती काळात आधार बनलेले खासदार आष्टीकर
प्रतिनिधी मुकूंद मोरे
आज मौलाना गल्ली, हदगाव येथे अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रस्ते, गल्ल्या, नाल्या सर्वत्र पाणीच पाणी… नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले होते. नागरिक भयभीत होते, जीवन ठप्प झालं होतं.
अशा बिकट परिस्थितीत, खासदार नागेश पाटील आष्टीकर स्वतः घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली. लोकांचे दुःख, त्यांची हतबलता त्यांनी जवळून अनुभवली आणि “मी तुमच्यासोबत आहे” हे शब्द देत त्यांनी लोकांच्या मनात नवा विश्वास जागवला.
यावेळी खासदार नागेश अष्टीकर तात्काळ तात्काळ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले व SDM हदगाव यांना फोन करून तात्काळ बोलावून घेतले गेले. संकट किती गंभीर आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. जिथे जिथे ये-जा अवघड झाली होती, तिथे नव्याने बांबू पायल्या टाकण्याच्या सूचना दिल्या.
आपली साथ हीच आमची ताकद








