पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या 66 सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार उपस्थित.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रज, राज्य शासन शिवछत्रपती क्रीडा पुरस्काथ्री राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते ॲड स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना दिनांक 7 मार्च 1960 रोजी झाली. अहवाल वर्षात संघाचे कार्यक्षेत्रात अकरा तालुक्यातील 979 प्राथमिक दूध संस्था व डेअरी फॉर्मच्या माध्यमातून गाय दूध 692.18 लाख लिटर्स व म्हैस दूध 42.81 लाख लिटर्स असे एकूण 733.99 लाख लिटर्स दुधाचे संकलन झालेले आहे. शासनाच्या अनुदान योजने अंतर्गत संघाच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या 2.75 कोटी लिटर दुधास शासनाकडून अनुदान मिळवून देण्यात आले आहे. अशाप्रकारे दूध संघाचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने चालले असून येणाऱ्या काळात आणखी चांगल्या पद्धतीने यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू असे आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी दूध संघाचे इतर सहकारी तसेच पुणे जिल्ह्यातील इतर मान्यवर देखील उपस्थित होते.








