अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
क्रिकेट स्पर्धेत प्रिन्सचे वर्चस्व
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : क्रीडा व युवक सेवा संचनालाय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारीकार्यालय परभणी आणि श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने घवघवीत यश मिळवले आहे.दि.25 आणि 26 सप्टेंबर रोजी नूतन महाविद्यालय सेलूच्या मैदानावर संपन्न झाले ल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने 17 वर्षाखालील मुले,17 वर्षाखालील मुली व 14 वर्षाखालील मुले अशा सर्व गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सेलू तालुक्यात वर्चस्व निर्माण करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली.या खेळाडूंना प्रमोद गायकवाड, कपिल ठाकूर, सुरज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे,सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षिरसागर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.








