आसमानी संकटात अडकलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांचा मराठवाडा दौरा!
प्रतिनिधी मुकूंद मोरे
मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, घरामध्ये पाणी शिरल्याने संसार उध्वस्त झाले. जनावरे वाहून गेली, हाताशी आलेले पिक डोळ्यासमोर वाहून गेले, कर्जाच्या डोंगरांमध्ये अडकलेला शेतकरी मायबाप पूर्णतः उध्वस्त झाला.
भारत हा कृषीप्रधान देश आहे.पण हा फक्त कागदावरच राहिला.
सत्तेचा माज असणारे सत्ताधारी माजलेले मंत्री हे स्वतःच्या जाहिराती आणि गरबा दांडिया खेळण्यांमध्ये व्यस्त आहेत. एक ही सत्ताधारी मंत्री शेतकऱ्यांची अश्रू पुसण्यासाठी बांधावरती आला नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे प्रत्येक तालुक्यात बांधावरची जाऊ शेतकऱ्याची संवाद साधत असून शेतकरी बांधवांना धीर देत आहेत. कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिलेली आहे .मस्ती मध्ये धुंद असलेल्या सरकारला जास्तीत जास्त मदत देण्यास भाग पाडू प्रत्येक हेक्टरी 50000 हजाराच्या पुढे मदत द्यायलाच लावू पण तुम्ही खचून जाऊ असे मायेचे शब्द त्यांना दिले.
जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर अस्मानी संकट आली जेव्हा जेव्हा शिवसेनाच रस्त्यावर उतरलेली आणि मदतीला धावली आहे. आणि हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आलेला आहे.
मस्तीचा माज आलेल्या सत्ताधारी मंत्र्यांनी शेतकऱ्याचा जास्त अंत पाहू नये जेवढी होईल तेवढी भरघोस मदत करावी. अन्यथा नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होयाला वेळ लागणार नाही.










