कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती डॉ. संजय रोडगे यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पीक पाहणी.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : (ता. 23) येथील
सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती डॉ. संजय रोडगे यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात शेतकऱ्यां च्या अडचणी जाणून घेऊन केली आहे. परंपरेप्रमाणे सत्कार समारंभ, हार-तुरे स्वीकारण्या ऐवजी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा निर्णय घेतला.
अलीकडेच सेलू तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि काल रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतांमधील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर यांसारखी खरीप पिके पावसा च्या पाण्यात बुडून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या घामाचे सोनं होण्याऐवजी पावसाने त्यांचा संसार उद्ध्वस्त केला आहे. या कठीण प्रसंगात मी शेतकऱ्यां सोबत आहे. शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” असे आश्वासन सभापती डॉ. रोडगे यांनी दिले.
सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती चे नवनिर्वाचित सभापती डॉ संजय रोडगे यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. काल झालेल्या राजवाडी येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे व निम्म दूधना प्रकल्पातून जास्त प्रमाणात पाणी सोडलेल्या मुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनी खडून गेले आहे. नारायण काष्टे, भास्कर शेवाळे यांच्या बांधावर जाऊन कापूस सोयाबीन तुर या पिकांचं खूप मोठं प्रमाणात नुकसान झाले पिके वाहून गेले. आहेत या सर्व परिस्थितीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत देण्यात येईल अशी ग्वाही सभपती डॉ. संजय रोडगे यांनी दिली. यावेळी संचालक अँड. दत्तराव कदम, सुरेंद्र तोष्णीवाल, भास्कर आबा पडघन, अनिल मामा पवार, सरपंच लक्ष्मण आण्णा गायके, सरपंच दिपक रोडगे, सरपंच शिवहरी शेवाळे, प्रकाश शेवाळे, आप्पासाहेब शेवाळे, रंगनाथ शेवाळे, भास्कर शेवाळे, मुरलीधर काष्टे, दत्तराव काष्टे, दिनकर शेवाळे, कुंडलीक काष्टे, विठ्ठल काष्टे, संतोष रोडगे, विश्वनाथ काष्टे, राजे बागवान, रशिद पठाण, मन्नान पठाण, गावातील नवयुवक तरुण मित्र मंडळ सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शेतकऱ्यांच्या घामाचे सोनं होण्याऐवजी पावसाने त्यांचा संसार उद्ध्वस्त केला आहे. या कठीण प्रसंगात मी शेतकऱ्यांसोबत आहे. शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” असे आश्वासन सभापती डॉ. रोडगे यांनी दिले.









