अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
देशात,महाराष्ट्र घटस्फोटांमध्ये अव्वल :- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांचा प्लॅन तयार..!!
संभाजी पुरीगोसावी नागपूर जिल्हा प्रतिनिधी
रूपाली चाकणकरांनी नुकताच नागपूर दौरा केला असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विरोधक टीका करत असतात. पण आयोग काम करत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. राज्यांतील महिला अत्याचारांच्या घटनांवर ताबा आणण्यासाठी राज्य महिला आयोगाकडूंन प्रयत्न सुरू आहेत लैंगिक अत्याचार रोखणे, बालविवाह रोखणे, आणि हुंडाबळी रोखणे यासाठी नेहमीच राज्य महिला आयोग नेहमीच प्रयत्नशील याच पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी देखील बैठका आणि आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. नागपूर वर्धा नांदेड आणि गोंदिया मध्ये सभा घेत रूपाली चाकणकरांनी महिला सुरक्षा आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आहे. यावेळी चाकणकर पुढे म्हणाल्या… की राज्य महिला आयोग राज्यांतील सगळ्या भागात तक्रार निवारण करत आहे. नागपूर हे मुख्यमंत्री फडणवीस यांचं शहरं आहे. या ठिकाणीहुन आमच्याकडे फार तक्रारी आलेल्या नाहीत. पण महाराष्ट्र देशात घटस्फोटाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ही आपल्यासाठी दुःखद गोष्ट आहे. त्या मधील कारणे शोधली पाहिजेत: त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त हुन मुलांवर त्याचे परिणाम होतात. त्यासाठी आम्ही जनजागृती आवश्यक आहे. या करिता काम करत आहोत अशी भूमिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी स्पष्ट केली आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रांमध्ये वर्किंग महिला आहे त्यांच्या सुरक्षेसाठी कमिटी आहेत. मात्र त्या कागदावर राहता कामा नयेत म्हणून आम्ही आय.सी कमिटी आँडिट झालं पाहिजे हे सरकारला सांगितलं होतं आणि सरकारने जीआर देखील काढला होता. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाल्यास त्याची तक्रार पोलिसांकडे करण्यापेक्षा एम.आयटी व्हायला पाहिजे. शाळेमधील मुली संदर्भात काळजी आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत तक्रार पेटी आवश्यक आहे. ऑनलाइन तक्रारी सुद्धा आहे. त्या संदर्भात जनजागृती आवश्यक आहे महिलांच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत त्याच त्याचे निवारण करणे आवश्यक आहे. जनजागृती आढावा बैठकीच्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.









