अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मरगुबाई मंदिर देवालयजवळ, नदीवेस, इचलकरंजी येथे बंच केबल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ
संपादक संतोष लांडे
इचलकरंजी शहरातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यरत असलेले कार्यसम्राट आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बंच केबल टाकण्याच्या महत्त्वपूर्ण कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचा शुभारंभ आमदार साहेबांच्या* शुभहस्ते संपन्न झाला.
या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना सुरक्षित, टिकाऊ व अखंडित वीजपुरवठा मिळणार असून विजेच्या तारा तुटून होणारे अपघात, शॉर्टसर्किट आणि विजेची हानी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळणार आहे. जुन्या वायरिंगच्या जागी अत्याधुनिक बंच केबल बसवल्याने वीजपुरवठ्याची गुणवत्ता वाढेल आणि नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
शुभारंभ स्थळ :
१) मरगुबाई मंदिर देवालयजवळ, नदीवेस, इचलकरंजी
या ठिकाणी झालेल्या शुभारंभ कार्यक्रमास स्थानिक नागरिक, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी आमदार डॉ. राहुल आवाडे साहेबांचा सत्कार करून नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले.
आमदार साहेबांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “इचलकरंजी शहराचा सातत्याने विकास व्हावा, नागरिकांना सुरक्षितता आणि सुविधा मिळाव्यात, हा माझा ध्यास आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात विकासकामे पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
खरंच, अशा विकासात्मक कामांमुळे इचलकरंजी शहर आधुनिक, सुरक्षित आणि प्रगतिशील वाटचालीकडे वाटचाल करत आहे.









