अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आमदार श्री बाबाजी काळे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचयातीने सहभाग घ्यावा
आमदार बाबाजी काळेंकडून प्रोत्साहनपर बंपर बक्षिसांची घोषणा
खेड
समृद्ध खेडी बनविणे हे आपले कर्तव्य-
पुणे खेड प्रतिनिधि हंसराज पाटील
-भारत देशाच्या
विकास होण्यासाठी समृद्ध खेडी बनविणे हे आपले कर्तव्य आहे त्या दृष्टीने विकासासाठी सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचयातीने सहभाग घ्यावा असे आव्हान खेड-आळंदी चे आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरूनगर येथे केले. यावेळी त्यांनी प्रोत्साहनपर बंपर बक्षिसांची घोषणा केली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेचे खेड पंचायत समितीच्या वतीने राजगुरूनगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार बाबाजी काळे बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक यशदाचे कुंडलिक कोहिनकर, सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष मनोहर पोखरकर, बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, माजी सरपंच केशव अरगडे, खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर, बांधकाम उपअभियंता जयंत कचरे, पाणी पुरवठा उपअभियंता कालिका खरात,कृषी अधिकारी सोनाली पवार, विस्तार अधिकारी सुकदेव साळुंखे, सुभाष भोकटे, रुपाली तांदळे, बबन मोरे, स्वाती भोईरकर, नामदेव बांगर, बी एस लोंढे यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, उपस्थित होते
गटविकास अधिकारी विशाल शिंदे म्हणाले,सरपंच ग्रामस्थ यांनी आपल्या गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी प्रयत्न करावेत. सांडपाणी, बंदिस्त गटार प्रश्न सोडवावा. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे प्रस्ताव तयार करून पाठवावे. ३१ डिसेंबर पर्यंतचे सर्व प्रस्ताव मंजूर करू. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार आहोत. स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे गावात राबवावे.
टप्पा २ प्रधानमंत्री आवास योजनेत तालुक्यात ३५०० घरकुल आहेत. अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याच्या प्रयत्न करावेत. वृक्ष लागवडीला प्राधान्य द्यावे. त्यासाठी काही संस्थाची मदत घ्यावी. ग्रामपंचायतीने नाविन्य पर्वक उपक्रम राबवावेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानचा जीआर वाचून त्याप्रमाणे सरपंचांनी काम करावे.
आमदार बाबाजी काळे म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा. शासनाकडूनन बक्षिसे तर मिळणार आहेत परंतु आपल्या ग्रामपंचायतीचा गावांचाही विकास होणार आहे.दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात हे अभियान राबविले जात आहे. सुमारे २९० कोटी रुपये ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून तरतूद झाली आहे राज्यात तालुकास्तरावर १५७ कोटी जिल्हा स्तरावर ३४ कोटी,विभाग स्तरावर २८.५० कोटी आणि राज्य स्तरावर २४.७५ कोटी कोटी आणि प्रचार प्रसार आणि इतर सर्व कार्यक्रमांसाठी ४५ कोटी असे २९०.३० कोटी अशी शासनाने तरतूद केली आहे.
चौकट ….
मी तालुक्याचा प्रतिनिधी, विकास कामांना गती देण्यात कमी पडणार नाही…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सर्वानी पुढे न्यायचे आहे. तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक आणि गावातील कर्तव्यदक्ष आजी माजी पदाधिकारी यांनी या अभियानाचे उद्दिष्टच सफल करावे. या अभियानामध्ये सर्वानी सहभागी व्हा, तुम्हाला ज्या ज्या स्तरावर मदत लागेल तेथे सर्व मदत शासनाच्या माध्यमातून, जिल्हा परिषद च्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून मिळेल. आमदार म्हणून मला जिथे कर्तव्य पार पडायला लागतील ती सर्व पार पाडली जातील.गाव पातळीवर वैयक्तिक पातळीवरचे सर्व प्रश मार्गी लावले जातील असेही आमदार काळे म्हणाले.
आमदार बाबाजी काळे यांच्या कडून बक्षिसांची घोषणा.
व्यासपीठावर असताना संकल्पना सुचली की, या अभियानातून ग्रामपंचायतीला गावाला शासनाकडून बक्षिसे दिली जातात. परंतु खरे काम करणारे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांसह ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी असतात. त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे त्यामुळे या अभियानात शासनाचे बक्षीस मिळणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचारी यांना आमदार निधीसह व आमदार बाबाजी काळे मित्र मंडळ, खेड पंचायत समिती यांच्याकडून बक्षिसे दिली जातील;असे आमदार बाबाजी काळे यांनी आपल्या भाषणात जाहीर केले
अशी असणार बक्षिसे –
तालुक्यामध्ये पहिल्या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवकाला अनुक्रमे १ स्कुटी- मोटारसायकल, एलईडी टीव्ही, फ्रिज. ग्रामपंचायत मधील शिपाई , क्लार्क,कम्प्युटर ऑपरेटर यांनाही बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे ३१ हजार रुपये,२१ हजार, १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. हि बक्षिसे प्रोत्साहन देणारी आहेत. तालुक्याच्या वतीने ते गरजेचे आहे .ज्या दिवशीही शासन बक्षीस जाहीर करील त्या दिवशी आपण हा कार्यक्रम पंचायत समितीघेणार असून त्यात हे वितरण केले जाणार आहे. बक्षिसांचा उद्देश आपण एक चांगलं काम कराव असा आहे. आमदार निधीतून पहिल्या नंबरमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायतीला जास्तीचा अनुक्रमे दहा, सात, पाच लाखाचा निधी दिला जाणार आहे.अशी घोषणा आमदार काळे यांनी केली . या कार्यशाळेत यशदाचे व्याख्याते कुंडलिक कोहिनकर यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन दमा पिंगळे यांनी केले. आभार विस्तार अधिकारी सुकदेव साळुंके यांनी मानले.
