अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वाढदिवस विशेष… कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी आँचल दलाल डूडी पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, सातारा, सांगली,पुणे विविध जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा..!!
माधवी गिरी गोसावी रायगड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग महिला आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आँचल दलाल डूडी मॅडम यांची चांगलीच ओळख आहे. अचल दलाल या एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला आयपीएस अधिकारी म्हणून राज्यात ओळखल्या जातात. त्यांनी अनेक महत्त्वांच्या ठिकाणी आपली जबाबदारी पार पडली असून गुन्हेगारी नियंत्रण, महिला सुरक्षा आणि सामाजिक सलोखा, यासारख्या मुद्यांवर त्यांचे काम उल्लेखनीय ठरले आहे. त्यांचा प्रशासनावर असलेला मजबूत पकड आणि जनतेशी असलेली जवळीक हे त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य मानलं जातं… सध्या त्या रायगड पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत त्यांनी सांगली सातारा पुणे येथेही उत्कृंष्ट सेवा बजावली आहे. सन 2018 च्या तुकडीतील भारतीय पोलीस सेवेतील महिला आयपीएस अधिकारी आहेत. दलाल आणि डूडी सिंह या परिवारांचे पोलिस आणि महसूल प्रशासनात अतिशय उत्कृंष्ट सेवा आहे. बदली झालेल्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील, रायगडच्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या आँचल दलाल डूडी मॅडम या पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या पत्नी आहेत. अशा या महिला आयपीएस अधिकारी, दबंग धडाकेबाज महिला आयपीएस अधिकाऱ्यास रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन आणि ग्रुप मधील सर्व पत्रकार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वाढदिवसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत.
