अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
काय राव, सगळ्या कामावर झटक्यात पाणी फिरले! फलटण पोलिसांकडून वाजला डीजे… पोलीस अधीक्षकांची फलटण च्या पोलिसांना धास्ती..!!
कलावती गवळी सातारा जिल्हा प्रतिनिधी
गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी फलटण पोलिसांनी डीजे वाजवाल तर कारवाईला सामोरे जाल, असा इशारा दिला होता मात्र कोणत्या कलमानुसार कारवाई केली जाईल हेही अधोरेखित केले. मात्र प्रत्यक्षात शनिवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे वाजला. त्यावर कहर म्हणजे रविवारी रात्री पोलिसांनीच त्यांच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजला. फलटण पोलिसांनी पोलीस ठाण्यात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. त्यांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करताना रविवारी स्वतःच डीजे लावून कर्णकर्कश गाण्यावर नाचण्यासाठी ताल धरला होता. मात्र फलटणला नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी कायदा व सुव्यवस्थेची चुणूक दाखवली आहे. मात्र फलटण पोलिसांनीच डीजे व लेझर लाईट विरोधांत कारवाईची घोषणा हवेतच विरली आहे. विशेष म्हणजे फलटण पोलिसांनी कारवाई करावी यासाठी समाज माध्यमांवर घेतलेल्या मतदानात 73 टक्के नागरिकांनी कौल दिला होता. असे असतानाही स्वतःच विसर्जन मिरवणुकीत डीजे लावल्याने नागरिकांवर कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. कापूस खरेदीसाठी गर्दी शनिवारी झालेल्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजापासून संरक्षण व्हावे. म्हणून कापसाचे बोळे कानात घातले जात होते. कापूस खरेदी करण्यासाठी मेडिकल दुकानात गर्दी झाली होती. त्यातील एक पोलीस म्हणाला… काय रावं आपण गणेश आगमनाच्या मिरवणुकीपासून जिल्ह्यात चांगले काम केले ज्यांनी आवाजाचे उल्लंघन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, परंतु फलटण येथे घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या सगळ्या कामावर पाणी फिरले. तर दुसरा पोलीस म्हणाला… आपल्यासारख्या पोलिसांनी सार्वजनिक नियम पाळले पाहिजेत. कदाचित या घटनेवर एसपी साहेब काहीतरी ॲक्शन घेतील असं मला वाटतंय पोलिसांची प्रतिमा सुधारत असताना असं भलतंच काहीतरी कोणाकडून घडतं अन् पोलीस दलाचं हसू होतं.
