अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शहाद्यात दि 18 सप्टेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
प्रा. डी सी पाटील नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
शहादा : येथील श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारी कै.अण्णासाहेब पी.के.पाटील स्मृती आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धा येत्या दि. 18 सप्टेंबर गुरुवार रोजी आयोजित करण्यात आली आहे. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक परिसराचे नेते कै. अण्णासाहेब पी.के. पाटील स्मृती आंतरमहाविद्यालयीन विभागीय (नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हा) पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धा गत दहा वर्षांपासून घेण्यात येत आहे. या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यातून स्पर्धक नोंदणी करत असतात. यावर्षी कै.अण्णा साहेबांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त दि. 18 सप्टेंबर 2025 गुरुवार रोजी मंडळाच्या डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात सकाळी 9:30 ते दुपारी 5 या वेळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयाला दोन स्पर्धकांचा संघ पाठवता येणार आहे. यासाठी स्वदेशी-स्वभाषा-स्वराज्य, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ज्ञानसाधना, पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमिका, जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल-वैश्विक अर्थव्यवस्थेच्या कट, निसर्ग कोपतो की माणूस चुकतो यापैकी एका विषयावर मराठी , हिंदी व इंग्रजी भाषेतून मत मांडता येणार आहे. यशस्वी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 10000 रुपये, द्वितीय पारितोषिक 7000 रुपये, तृतीय पारितोषिक 5000 रुपये (स्पर्धक व महाविद्यालय यांना विभागून) तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपयांची दोन पारितोषिक दिले जाणार आहेत. स्पर्धक व महाविद्यालयांनी सहभागाची नोंदणी दिलेल्या लिंकवर दि. 15 सप्टेंबर पूर्वी करावी असे संयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा उद्घाटन सोहळा मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात येईल. स्पर्धेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील व श्री.पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनचे सचिव प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, कार्याध्यक्ष डॉ. एस. पी. पवार, डॉ.आर.एस. पाटील यांच्यासह समितीचे सदस्य व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी नियोजन करीत आहेत. अधिक माहितीसाठी डॉ.चंद्रशेखर सुतार व डॉ.तुषार पटेल यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती प्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांनी दिली आहे.
