अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सामाजिक एकात्मतेचा संदेश देत ‘स्नेहबंध’ तर्फे बाप्पांची आरती.
प्रतिनिधी सारंग महाजन महाजन
अहिल्यानगर – स्नेहबंध सोशल फौंडेशन, अहिल्यानगर कार्यालयात गणेश आरतीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. या आरतीचा मान भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश मुलगीर यांच्या हस्ते करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा शहराध्यक्ष अमित खामकर, स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, दै. जनप्रवास प्रतिनिधी संजय सावंत, पो.हे.कॉ.अजय गव्हाणे, राहुल कदम, पियुष शिंदे यावेळी उपस्थित होते.
सहा.पो.नि. मुलगीर म्हणाले, “गणेशोत्सव हा सामाजिक एकात्मता, श्रद्धा व संस्कृती जपणारा उत्सव आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केल्यास सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते.
