अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
०२ दुचाकी व १७ मोबाईल हॅन्डसेट चोरणा-या विधीसंघर्षित बालकाकडुन ४,१७,५००/- रु.कि.च्या मुद्देमालासह घेतले ताब्यात.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
काळेपडळ पो.स्टे.गु. रजि.नं.१९५/२०२५ बी.एन. एस. कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार लाहीगुडे यांनी विश्लेषण करून सदर मोबाईलचे ठाव ठिकाण्याबाबत माहीत घेता, सदर मोबाईलचे लोकेशन हे तरवडेवस्ती, महंदवाडी, पुणे येथे असल्याचे तपासादरम्यान समजले. तरी सदर ठिकाणी पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले यांनी सदर परिसरात चोरट्या इसमाबाबत माहीती घेता व त्यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर विधीसंधर्षित बालक वाचा शोध घेवून तो तरवडेवस्ती येथे चोरीच्या दोन मोबाईल सह मिळुन आला.
सदर विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेवुन त्याचे घराजवळ जावुन पाहणी करता, त्याचे घरासमोर दोन दुचाकी गाड्या दिसून आल्या असता, त्यापैकी एका मोपेड दुचाकी गाडीच्या पुढील बाजुस मोकळ्या जागेमधील हुकला एक पांढ-या रंगाचे पिशवी अडकवलेली दिसून आली असता, सदर पिशवी उघडुन पाहीली त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे १५ हॅन्डसेट मोबाईल फोन मिळुन आले आहे. तरी मिळुन आलेल्या मोबाईल व दुचाकी गाडयांबाबत विधीसंघर्षित बालकाकडे विचारपुस करता, त्याने नमूदचे मोबाईल फोन हे त्याचे इतर दोन साथीदारांसह मिळुन काळेपडळ, भारती विद्यापिठ परिसरातुन चोरी केले आहे व सदरच्या दुचाकी गाडया हया त्याचे दोन साथीदारांसह मिळुन रस्तापेठ व हांडेवाडी परिसरामधून चोरी केले असल्याचे सांगितले आहे. तरी नमूद विधीसंघर्षित बालकाकडुन काळेपडळ पो.स्टे.गु.र.नं १९५/२०२५ बी.एन.एस. कलम ३०५, (जे), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल असुन तपासादरम्यान विविध पोलीस स्टेशनचे गुन्हे उघङकिस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तरी वरील नमूद दाखल गुन्हयातील नमूद विधीसंघर्षित बालकाकडुन एकुण ४,१७,५००/- रुपये किंमतीचे मोबाईल हॅन्डसेट व दोन दुचाकी गाडया हस्तगत करून गुन्हे उघडकिस आणले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त परि-५, पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, श्री.मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने केली.
