अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
सोसायटीच्या जनरेटर रुममधील बॅट-या चोरणा-या चोरट्यास ठोकल्या बेड्या १,६०,०००/- रु. किं.चा. मुद्देमाल केला जप्त
पुणे:काळेपडळ पो.स्टे. गु.रजि.नं. ३२०/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२).३ (५) गुन्हा नोंद असून पोलीस हवालदार प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर असे दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळा च्या आजुबाजुच्या परिसरात दाखल गुन्ह्यातील जप्त सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीत यांचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना गुप्त बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम लावण्य हॉटेलच्या पुढे नाल्याजवळ, महंमदवाडी, पुणे येथे त्याच्याकडील दुचाकीवर चोरीची बॅटरी ठेवुन विक्रीसाठी थांबलेला आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळताच पंचांसमक्ष त्यांनी सदर इसमास शिताफीने ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्यातील चोरी झालेली एक एक्साईड कंपनीची बॅटरी व गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडीसह ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव-पत्ता विचारता त्याचे नाव जाहिद शरिफ शहा, वय १९ वर्षे, रा-गल्ली नं. ०६, अक्षरधाम सोसायटीजवळ, शिवनेरीनगर, कोंढवा खु. पुणे असे असल्याचे सांगुन सदरचा गुन्हा त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह केला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने दाखल गुन्ह्यातील उर्वरीत तीन बॅट-या झुडीओ मॉलसमोरील मोकळ्या जागेतून काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी कडुन अशा एकुण ६०,०००/- रु. किंमतीच्या ०४ एक्साईड कंपनीच्या बॅट-या व व १,००,०००/- रु.किं.ची. गुन्हा करताना वापरलेली डार्क निळ्या रंगाची अॅक्सेस मोपेड असा एकुण १,६०,०००/- रु. किंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त परि-५, डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अमर काळंगे, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिंदे यांचे पथकाने केली.
