अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
1 किलो 666ग्रॅम वजनाचा गांजा जप्त हडपसर पोलीसांची मोठी कारवाई
पुणे जिल्हा उपसंपादक गणेश राऊत
पुणे शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाया गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस स्टेशन हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यसासाठी तसेच अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), श्रीमती अश्विनी जगताप, यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू करण्यात आली.
दिनांक २३/०८/२०२५ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, भगवान हंबर्डे, महेश चव्हाण, अजित मदने, महावीर लोंढे, बापु लोणकर, नामदेव मारडकर यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार मगवान हंबर्डे व महेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून सागर मल्हारी राखपसरे वय ३४ वर्ष रा. कुंजरीवस्ती मांजरी पुणे यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची झडती घेतल्यावर त्याच्या ताब्यातील नायलॉन पिशवीत हिरवट-तपकिरी रंगाचा ओलसर गांजा आढळून आला. ५०,०००/-रु.कि.चा. वजन १ किलो ६६६ ग्रॅम असून त्याबाबत हडपसर पोलीस ठाणेस ७६२/२०२५ एन. डी.पि.एस. अॅक्ट कलम ८ (क),२० (ब) (त्त्) (अ), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि-५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती अश्विनी जगताप, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, यांचे पथकाने केली.
