अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दंगा काबू योजना व रूट मार्च गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांचा सराव.
पुणे जिल्हा उपसंपादक गणेश राऊत
हडपसर :पुणे शहरात आगामी साजरा होणाया गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद सण शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावा या उद्देशाने हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक २६/०८/२०२५ रोजी सकाळी १०/५५ ते ११/४० वा. दरम्यान दंगा काबू योजना रूट मार्च घेण्यात आला.
दंगा काबु योजना/रुट मार्च मा. पोलीस उप आयुक्त, परि ५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली तसेच मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस श्री. संजय मोगले, स्टेशन, पुणे शहर, पोनि (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
रूट मार्च दरम्यान सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशन कडील उपलब्ध साधन सामग्रीची माहीती देण्यात आली. हडपसर गाडीतळ- गांधी चौक राम मंदीर पांढरे मळा नालबंद मस्जिद मंत्री मार्केट-हडपसर भाजी मंडई, गांधी चौक ते हडपसर पोलीस स्टेशन असा रूट मार्च काढण्यात आला. सदर दंगा काबू योजना रूट मार्च करीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप, व पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थीत होते.
