अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पीक विम्याची रक्कम हडप एजंट मालामाल.
देवळा /दहिवड युवराज देवरे
देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन 2023/24 मधील प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे.विमा कंपनी प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात शासनाची लूट करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र व मिळणारी रक्कम यांच्यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे. कंपनी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्षात न जाता गावातील ठराविक ठिकाणी एका जागी बसून पंचनामे करून घेतले. ज्या शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधींना 50 टक्के रक्कम देण्याचे मान्य केले त्या शेतकऱ्यांना 90 /95 टक्के नुकसान दाखवून प्रतिनिधींनी त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासनाकडून रक्कम मिळवून दिली. मात्र ज्या शेतकऱ्यांनी 50 टक्के रक्कम देण्याची नाकारले त्यांना मात्र आठ दहा टक्के नुकसान दाखवून जी रक्कम मिळाली ती अतिशय कमी आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंपनी प्रतिनिधी मात्र मालामाल झाल्याचे दिसून आले.
सदर प्रकार हा खेदजनक असून प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही एक शेतकऱ्यांसाठी संजीवनी असून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासकीय योजना आहे मात्र त्या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कमी झाला मात्र कंपनी प्रतिनिधी एजंट यांनी 50 टक्के रक्कम जमा करून मोठी माया जमवली आहे. अशा प्रकारांनाआळा घालण्यासाठी व कंपनी प्रतिनिधी एजंट यांच्यावर शासनाची फसवणूक व शेतकऱ्यांची लूट केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारांची बँक खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर योग्य कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी चांदवड , तहसीलदार देवळा, तालुका कृषी अधिकारी देवळा, यांना निवेदन देण्यात आले यावेळी अनेक वंचित शेतकरी उपस्थित होते एका महिन्याच्या आत संबंधित ठेकेदार प्रतिनिधी यांच्यावर योग्य कारवाई करा करा नाहीतर त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला.
