अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
शिवसेना वडगावशेरी विधानसभेच्या वतीने स्वातंत्र्य दिन रक्षाबंधन निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधन निमित्त शिवसेना वडगावशेरी विधानसभेच्या वतीने पुणे शहर व वडगाव शेरी येथील शिवसेना महिला भगिनीं नागालँड आणि जम्मू कश्मीर येथील सीमेवर रक्षण करणारे सैनिकांना 700 राख्या पाठवले, शिवराज विद्यामंदिर सोमनाथनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच शाळेला दोन घड्याळ माजी सैनिक कॅप्टन संजय मोटे, सुभेदार मेजर अशोक पाटील, यांच्या हस्ते सप्रेम भेट देण्यात आले होते, यावेळी नीलम अय्यर, स्वीकृत नगरसेवक संजय कदम, विशाल साळी, शिवसेना पुणे शहर संघटक विनोद करताल, आशिष कांबळे, महिला आघाडी वडगाव शेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिता परदेशी, महिला आघाडी पुणे शहर समन्वयक पद्मा शेळके, जिजाबाई ढोकले, विभाग प्रमुख राहुल अग्रवाल, शेरसिंग राजपूत, विनय गलांडे, प्रदीप ढोकले, हेमंत बत्ते, आत्माराम धुमाळ, सिद्धार्थ गायकवाड, रितेश शिंदे, संतोष येमुल, धनंजय कोठावळे, श्याम ताटे, रिंकू शर्मा, विष्णू संकपाळ, सनी गायकवाड, संदीप सावंत आदि यावेळी उपस्थित होते
शिवसेना पुणे शहर सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा शहर संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, पूजाताई रावतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानणारे शिवसेना पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांनी केले होते,
