अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ग्रामक पंचायत महाराष्ट्र च्या जिल्हाध्यक्षपदी धाराजी भुसारे यांची निवड.
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
परभणी :परभणी शहरात ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची 3 ऑगस्ट 2025 रोजी सोपानराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत मराठवाडा संघटक बालाजी लांडगे यांनी धाराजी भुसारे यांचे परभणी जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली तर यावेळी दुसऱे संघटक हेमंत वडणे यांनी केंद्रीय कार्यकारणीच्या वतीने शुभेच्छा देत पुढील कार्यास जिल्हा कार्यकारणीला सर्वपरीने सहकार्य मिळेल असे आश्वासन देण्यात आले
ग्राहक पंचायत महाराष्ट्र परभणी साठी जिल्ह्यात संघटना बांधणी व भविष्यात कार्यक्रमाचे नियोजन या संदर्भात ३ ऑगस्ट 2025 रोजी सोपानराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. प्रथम अधिष्ठान स्वामी विवेकानंद व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुणे यांचे स्वागत धाराजी भुसारे, संदीप गव्हाणे, विश्वनाथ दिघे, नितीन पाटील, शांतीलाल शर्मा, जयश्रीताई भोसले, विशाल तनपुरे ,सोपान मोरे सूर्यकांत मोगल, गुणाजी सुरवसे, दीपक मुळे ,भास्कर पंडित यांनी केले या बैठकीत विभागीय संघटक बालाजी लांडगे पुणे यांनी धाराजी भुसारे यांची परभणी जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली तर यावेळी दुसरे संघटक हेमंत वडणे यांनी केंद्रीय कार्यकारणीच्या वतीने धाराजी भुसारे यांना शुभेच्छा देत परभणी जिल्हा कार्यकारणीला सर्वतोपरीने सहकार्य केले जाईल असे सांगितले. यावेळी धाराजी भुसारे यांनी परभणी जिल्ह्यात प्रथम संघटन बांधणीस प्राधान्य देऊन गाव तिथे शाखा हे अभियान राबवत ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातील असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव काळदाते हे उपस्थित होते. यावेळी संदीप गव्हाणे यांनी संघटनेत देवलिंग देवडे यांनी स्फूर्ती येईल असे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगून असा सत्कार परभणी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद वाकडे यांनी केले तर या आभार विवेक डावरे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर झांबरे रमेशराव भिसे, ज्ञानोबा धोंडगे श्रीनिवास पत्तीवार नितेश बनसोडे छत्र गुण नांदुरे यांनी प्रयत्न केले.
