एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सततच्या पाठपुराव्यानंतर गावडे जलतरण तलाव अखेर सुरु

सततच्या पाठपुराव्यानंतर गावडे जलतरण तलाव अखेर सुरु

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव

चिंचवड: चिंचवडगाव येथील स्व.बाळासाहेब विठोबा गावडे जलतरण तलाव गेले दोन महिने नादुरुस्थ म्हणून बंद होता.
महावितरण समिती सदस्य व वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे व भारत केसरी पै. विजय गावडे सोशल फाउंडेशन यांनी पालिका क्रीडा उपायुक्त पंकज पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते तलाव लवकर चालू न केल्यास उपोषण करणार होते पण त्या वेळी आधीकाऱ्यांनी काही अडचणी सांगितल्या व थोडा वेळ द्या अशी विनंती केली होती त्यामुळे बच्चे यांनी उपोषण करण्याचे स्थगीत केले होते.परंतु तलाव सुरु होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवल्यामुळे आज 15 जुलै रोजी सकाळी 6 वा मधुकर बच्चे ,भारत केसरी पै. विजय गावडे,
यांच्या हस्ते जलपूजन,नारळ फोडुन पहिली बॅच करण्यात आली.
त्यामुळे या तलावात पोहण्यास येणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले.अनेक पत्रकारांनी याचा पाठपुरावा घेतला.उपायुक्त पंकज पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्यात असणाऱ्या सर्व अडचणी अतिशय कौशल्याने दूर करीत सहकार्य केले.

 

उपस्थितांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.
लायन्स क्लब अध्यक्ष रवींद्र काळे,
वुई टुगेदर फाउंडेशनचे
सलीम सय्यद,जयंत कुलकर्णी,दिलीप चक्रे,अनिल गावडे ,दिनेश राजपूत,
जाकीर सय्यद, नंदकुमार वाडेकर, विलास रासकर ,अर्जुन पाटोळे, प्रमोद आढाव, दीपक तरडे ,अतुल गुजर , झेंडे निलेश आवारे , तोष्णीवाल राऊत, संध्या मॅडम, वासंती काळे
आदी फाउंडेशन पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link