अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखे कडुन कोंढवा भागात १४,९८,०००/- रु.कि.चा आफिम हा अंमली पदार्थ केला जप्त.
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
कोंढवा :दि.०५जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व पोलीस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोंढवा पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन माळवे यांना मिळालेल्या बातमीनुसार दि.०५जुलै २०२५ रोजी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये भैरवनाथ मंदिर मागे संत कृपा बिल्डींग समोर, सार्वजनीक रोडवर कोंढवा, पुणे येथे इसम नाव मागीरथराम रामलाल विष्णोई वय ४६ वर्ष रा. गल्ली नं-३ टिळेकर नगर, कोंढवा (बु), पुणे याच्या ताब्यातुन एकुण १४,९८,०००/-रु.कि.चा ७४९ ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ, ५०००/- रु.कि.चा एक मोबाईल फोन, २००/- रु.कि.ची एक हँड बॅग, १०००/- रु.कि.चा ईलेक्ट्रॅनीक वजन काटा असा एकुण १५,०४,२००/-कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखे कडुन विबवेवाडी भागात ११,२४.०००/- रु किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त.
दि.०५/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील बिबवेवाडी पोलीस ठाणेव्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझीम शेख यांना मिळालेले बातमीनुसार दि.०५/०७/२०२५ रोजी बिबवेवाडी, पुणे येथे इसम नामे विठ्ठल उर्फ अण्णा रघुनाथ कराडे, वय ५७ वर्षे रा. बिबवेवाडी, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण ११,०२,०००/- रु.कि.चा ५५.१०० ग्रॅम मेफेड्रॉन (M.D) हा अंमली पदार्थ, २०००/-रु.कि.चा ईलेक्ट्रॅनीक वजनकाटा व २०,०००/- रु.कि.चा मोबाईल फोन असा एकुण ११,२४,०००/-रु.कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. विवेक मासाळ, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली.
