अभिनेता आदर्शचंद्र अरुण राऊळ यांनी जिद्दीच्या जोरावर मराठी मालिकांमध्ये ठसा उमटवला
.
प्रतिनिधी शेवगाव पांडुरंग गोरे
नाशिक येथील रहिवाशी व मुळगाव नृसींह सरस्वतींच्या जन्मगावाचे म्हणजेच कारंजा ( लाड ) येथील आदर्शचंद्र राऊळ यांनी अल्पावधीत काळामध्ये मराठी मालिका विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे . व्यावसायिक , अभिनेता , लेखक व दिग्दर्शक अशी चौफेर बाजू सांभाळत त्यांनी आपली मराठी मालिकां मध्ये आवड छंद जोपासली आहे . अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता , या क्षेत्रात कोणीही गॉड फादर नसतानी , मराठी चित्रपट महादेव व सनी या चित्रपटामध्ये झळकले आहेत . त्यांचे पहिले प्रकाशित मराठी पुस्तक मृदगंध आठवांचा हे पुस्तक वाचक प्रेमीं साठी उपलब्ध करून दिले आहे . त्याचबरोबर काही एकांकिका ही केल्या आहेत . जसे काळ्या बंबाळ अंधारी ( सुलेमान ), एक स्वप्न गर्भाचा मृत्यू ( भिकारी) , प्रश्न आणि उत्तर ( प्रश्न ) , दिक्षा मध्ये (बाबूजी ) , मुमुक्षांच्या यज्ञात क्षज्ञांचा बळी यात पार्श्वसंगीत व प्रकाशयोजना . त्याचबरोबर आदर्शचंद्र राऊळ यांनी लघु चित्रपटांमध्ये हॅप्पी बर्थडे बाबा यामध्ये बाबाचे पात्र साकारले आहे, जी आर एक नवी सुरुवात यामध्ये मुलीचे वडील, वॉटर एक प्रेम कथा यामध्ये प्रमुख पाहुणे , ढोलकी मध्ये डॉक्टर , मंजुशा , आश्रय द शेल्डर मध्ये सासरा, आग्या मोहोळ मध्ये डॉक्टर अशा विविध भूमिका साकारलेल्या आहेत . त्याचबरोबर जाहिरात ऍडव्हर्टाईज माध्यमातूनही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे . आनंदीवास्तूचे आनंद पिंपळकर यांच्या आलंय माझ्या राशीला या मराठी चित्रपटाच्या प्रोमो मध्ये झळकले आहेत . येवल्याची सोनी पैठणी, आमदार काळेंची राजकीय जाहिरात, सुवस्थी आयुर्वेदिक उत्पादन अशा जाहिरातीं मध्ये झळकले आहेत . तसेच गाण्यांचा अल्बम बायडी मध्ये बीग बाॅस मराठी फेम पुष्पर जोगच्या वडीलांचा रोल , शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा मुख्य पात्र .
त्याच बरोबर सध्या विविध चॅनेलवरील दूरदर्शन मालिका . जसे सुंदरा मनामध्ये भरली , कलर मराठी यात विविध पात्र जसे की सावकार , ट्रान्सपोर्ट मालक , गुप्तहेर . योग योगेश्वर जय शंकर कलर्स मराठी मुख्य पंच , तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं , झी मराठी , या मध्ये पात्र गावकरी , तुझं माझं सपान सोनी मराठी, पात्र महादबा , डिलर . प्रितीचा वनवा उरी पेटला , कलर्स मराठी पात्र गावकरी , सावली होईन सुखाची ,सन मराठी पात्र युनियन लिडर , पालक , कंपनी मॅनेजर , लय आवडतेस तू मला कलर्स मराठी , पात्र बळवंत , व सध्या गाजत असलेली मराठी सिरीयल इंद्रायणी कलर्स मराठी पात्र शिक्षणाधिकारी . या भागामध्ये त्यांनी शिक्षण अधिकार्याची भुमिका खूप चांगली साकारली आहे . व प्रेक्षकांना अभिनय भावला आहे , आई-वडिलांचा आशीर्वाद , कुटुंबाची साथ व जिद्दीच्या जोरावरती , खुप मोठा संघर्ष करून , संयम कष्ट, मेहनत करून अभिनेता आदर्शचंद्र राऊळ यांनी हे यश मिशवलेले आहे . अशा जिद्दी कलाकारांचे कौतुक व अभिनंदन जरूर व्हायला पाहिजे, त्यांच्या पुढील वाटचाली साठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
