मधु ताराची दिव्यांग रुग्णास हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट
सह संपादक गोपाळ भालेराव
दिनांक 24 जुलै 2025 रोजी किडनी.लिव्हर. अन्यव्याधिनी त्रस्त असणारे पुण्यातील चाकण भागात राहणारे दिव्यांग आपुलकी फाऊंडेशनचे दिव्यांग असणारे श्री राजाराम गांधीले यांची मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशनचे प्रमुख श्री नितीनजी शिंदे.मधु तारा राज्य दिव्यांग विभागाच्या 86 टक्के दिव्यांग असलेल्या राज्य अध्यक्षा निर्मलाताई चौधरी.मधु तारा पिंपरी चिंचवड प्रमुख श्री हसनभाई मुलाणी.ह.भ.प. आदरणीय श्री माऊली दादा चौधरी यांनी वाय.सी.एम.रुग्णालय पिंपरी पुणे येथे जाऊन श्री गांधीले यांची विचारपूस केली व उपचार प्रक्रियेबाबत माहिती घेतली.
श्री राजाराम यांच्या उपचारासाठीची मदत करीता माहिती निर्मला ताई यांनी मधु तारा प्रमुखांसमोर मांडली होती आणि त्यांच्याच नियोजनातून ही भेट पार पडली.
या वेळी मधु तारा पिंपरी चिंचवड प्रमुख श्री हसनभाई मुलाणी यांनी त्यांच्या हॉटेलच्या माध्यमातून भोजन सेवा देण्याचे सांगत अडीअडचणीला मधु तारा तुमच्या सोबत आहे असे म्हटले.या वेळी श्री गांधीले त्यांच्या कन्या मयुरी गांधीले यांनी मधु तारा टीम हॉस्पिटल मध्ये येऊन भेटल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
