चौसाळा येथे गुरूवारी संत मुक्ताबाई पालखीचे आगमन
(चौसाळा प्रतिनिधी) विवेक कुचेकर
प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा गेल्या कित्येक वर्षापासून बालाघाटावरील चौसाळा नगरीतून मार्गस्थ होतो ही वारकरी सेवा कै.
दिगंबर तात्या शिंदे यांच्यापासून सुरू केलेली आहे
त्यानंतर त्यांचे नातू कै. संजय (दादा )शिंदे यांनी सुरू ठेवली व त्यांच्या पश्चात आता विठ्ठल जनार्दन शिंदे हे या दिंडीचे भव्य दिव्य असे वाजत गाजत दिंडीचे स्वागत चौसाळा नगरीत करतात ही दिंडी दिनांक 26 जून 2025 रोजी चौसाळा शहरात दाखल होत असुन याची जय्यत तयारी सुरू आहे
तरी चौसाळा व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी गुरूवार दि. 26 जून 2025 रोजी मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याच्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मुक्ताईनगर चौसाळा या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन
समर्थ विठ्ठलराव शिंदे पाटील यांनी केले आहे
