एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी किशोर गुडेकर

मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम १५ जून रोजी नवीन पनवेल येथील रोटरी स्कूल हॉल येथे संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे विश्वस्त अजय कापरे यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री. बाळाराम पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते १०० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी बोलताना बाळाराम पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, चिकाटी व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठावे. अशा सन्मानाने विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते.

 

तसेच कार्यक्रमा वेळी नवनाथ साबळे माजी गटशिक्षणाधिकारी यांनी मुलांनी मोबाईलचा योग्य तो वापर करावा आणि आपल्या करिअर साठी त्याचा फायदा करावा असे सूचक माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाला भरत जाधव नवी मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक, महेश पाटील अध्यक्ष लक्ष्मी पब्लिक स्कूल, जेके कुंभार सर माझी पर्यवक्षक बाठीया स्कूल, सुरेश पाटील माजी मुख्याध्यापक के व्ही कन्या हायस्कूल, विलास फडके माजी जिल्हा परिषद सदस्य पनवेल, प्रकाश म्हात्रे जिल्हाचिटणीस शेकाप, माजी नगरसेविका नीता माळी, अनंत वारे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल, देविदास गायकवाड अध्यक्ष पनवेल प्रेस क्लब, किरण बाथम संपादक डेली टाइम्स 7, पत्रकार सुनील भुजबळ, अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा संपादक,सुरेश भोईर कार्यकारी संपादक दैनिक युवक आधार, विलास गायकवाड उपसंपादक दैनिक युवक आधार, विजय दूंद्रेरेकर कोकण विभाग प्रमुख दैनिक युवक आधार, आदि उपस्थित होते.कार्यक्रम चे सूत्रसंचालन दिग्दर्शक विशाल सावंत यांनी केले व

 

कार्यक्रमाच्या शेवटी बबन बारगजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष संतोष शिवदास आमले, सचिव दिलीप कोकाटे, कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे, अजय कापरे, प्रशांत गांगर्डे, बबन बारगजे, अशोक घनवट, अण्णा शिंदे, शरद घुले, बाळा झोडगे, बबन खीळदकर, बाळू शेळके, दादासाहेब घालमे,
पदाधिकारी, पालक विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व कार्यक्रमाला अल्पउपहार प्रशांत गांगर्डे यांच्या वतीने देण्यात आला
कार्यक्रमाचे सुंदर संयोजन मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link