एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिरवळ पोलीस स्टेशनं हद्दी मध्ये बाहेरुन आलेल्या कामगारांची व भाडेकरूंची चारित्र्य पडताळणी व विदेशी नागरीकांनचे आगमनाचे माहिती पोलीस स्टेशनंला देण्यात याव्यात

शिरवळ पोलीस स्टेशनं हद्दी मध्ये बाहेरुन आलेल्या कामगारांची व भाडेकरूंची चारित्र्य पडताळणी व विदेशी नागरीकांनचे आगमनाचे माहिती पोलीस स्टेशनंला देण्यात याव्यात.

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव

शिरवळ :शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम.आय.डी.सी. असल्यामुळे मोठ्या प्रमाणात परराज्यातुन व महाराष्ट्रातून बऱ्याच प्रमाणात कामगार कंपनीमध्ये व हॉटेलमध्ये कामास आलेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात आलेले कामगार भाड्याने घर घेवुन राहत आहेत. त्यांच्या मध्ये पाकीस्तानी नागरीक बाग्लांदेशी नागरीक, रोहिंग्या किंवा गुन्हे करुन कोणासही काही एक माहीती न देता शिरवळ मध्ये काम करुन भाड्याने राहत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील कामगार व भाडेकरु यांची पडताळणी करून घेण्यात यावी व पडताळणी न केल्यास त्यांचे कडुन एम.आय.डी.सी मध्ये व शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत ते कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व कंपनी व्यवस्थापन, कंपनी मालक, कॉन्ट्रॅक्टर व घर भाड्याने देणारे घर मालक, यांनी आपल्या कडे कामास असलेले कामगार व घर भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूंची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच घर भाड्याने देताना रितसर रजिस्टर अॅग्रीमेंट करणे गरजेचे आहे.तरी यासर्व आवश्यक कायदेशिर बाबींची पूर्तता करणेस टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे. ही बाब गंभीर आहे.
आपल्या कडील कामगारांचे, भाडेकरूंचे चारित्र्य पडताळणीची माहीती व घराबाबत रजिस्टर अॅग्रीमेट करुन त्याची प्रत पोलीस स्टेशन ला व ग्रामपंचायतीकडे देणे आवश्यक आहे. जेणेकरुन पोलीस स्टेशन शिरवळ व संबंधीत ग्रामपंचायत यांना बाहेरुन शिरवळ मध्ये आलेल्या कामगारांची व भाडेकरूंची माहिती मिळेल.
तसेच कंपन्यांमध्ये चारित्र्य पडताळणी न करता कामगार कामावर ठेवल्यास तसेच घरमालकांनी आपले घर चारित्र्य पडताळणी न करता, तसेच रजिस्टर अॅग्रीमेंट न करता घर भाड्याने दिल्यास व त्यांचेकडून काही अपराध घडल्यास किवा ते पाकिस्तानी, बांग्लादेशी अथवा रोहींग्या असलेचे आढल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरणेत येईल याची कृपया नोंद घ्यावी.
शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल/लॉज मालक व चालक यांनी विदेशी नागरीक आपल्या कडे राहण्यास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन ला कळविणे व त्याबाबतचे ऑनलाईन कागदपत्रांची पुर्तता करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये हयगय झाल्या स आपल्या विरुद्ध अपराध दाखल होऊ शकतो. पोलीसांनी दिलेल्या नियमांचे पालन करुन सुरक्षेकामी पोलीसांना कंपनी प्रशासन, घरमालक व हॉटेल/लॉज चालक मालक सहकार्य कराये असे जाहीर आवाहन शिरवळ पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link