एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलीस ठाणे बेलतरोडी – MPDA कायद्या अंतर्गत सराईत व धोकादायक गुन्हेगाराची कारागृहात रवाणगी करण्यात आली

पोलीस ठाणे बेलतरोडी – MPDA कायद्या अंतर्गत सराईत व धोकादायक गुन्हेगाराची कारागृहात रवाणगी करण्यात आली

प्रतिनिधी: सतीश कडू नागपूर

नागपूर :शहर यांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए कायद्यांतर्गत कारवाई कारण्या बाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नाव सनी संताराम गायकवाड वय 25 वर्ष रा कैकाडी नगर* ,पो ठाणे बेलतरोडी नागपूर याच्या विरुद्ध शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे, दुखापत,जबरी चोरी, सार्वजनिक ठिकाणी अवैद्य शस्त्र घेऊन धूमधाम करणे, अग्नि शस्त्र वापरणे (भारतीय हत्यार कायदा),शिवीगाळ करून मारपिट करणे यासारखे गुन्हे दाखल होते. त्याच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नव्हती. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे परिसरामध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे सदर आरोपी विरुद्ध मा. सहा.पोलीस आयुक्त, श्री नरेंद्र हिवरे, अजनी विभाग, मा.पोलीस उपायुक्त,रश्मिता राव एन परिमंडळ -4, मा. अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, तसेच मा.सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचच्या सहकार्याने मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांना सदर आरोपीस MPDA कायद्या अंतर्गत कारागृहात रवानगी करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावानुसार मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी नमूद आरोपीस MPDA कायदा कलम 3 अंतर्गत रवानगी करण्याबाबत आदेश दिल्या नंतर सदर आरोपीस आज दिनांक 10/06/2025 रोजी रात्री 21.00 वाजता नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे पाठवण्यात करण्यात आले आहे.सदर कामगिरी बेलतरोडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link