एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

१२ शिक्षक व एक हजार विद्यार्थ्यांचा “प्रतिभा सन्मान २०२५” अंतर्गत गौरव

प्रतिनिधी : रवींद्र पाटील नाशिक – नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना (PCCDA) आणि संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “प्रतिभा सन्मान २०२५” या कार्यक्रमात नाशिक शहर व जिल्ह्यातील नामवंत शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या १२ शिक्षकांना विविध सन्मानचिन्हांनी गौरवण्यात आले. त्याचबरोबर दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना बक्षिसे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. पंकज धर्माधिकारी, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे हे उपस्थित होते.

जीवनगौरव पुरस्काराने दीपक शिवले, दिनकर नेहे, पवन जोशी आणि अमिन शाह यांना सन्मानित करण्यात आले.

संगीत व अभिनय क्षेत्रातील पुरस्कार नंदकुमार देशपांडे व नितिनकुमार चव्हाण यांना प्रदान करण्यात आले.

‘बेस्ट कोचिंग टिचर्स’ पुरस्काराने भाग्यश्री दराडे, स्वप्नील कदम, प्रवीण गडाख, योगेश बोरसे, हेनरी सरदार व वैशाली भोर यांचा गौरव झाला.

प्रत्येक कोचिंग क्लासमधून दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सन्मान देण्यात आला.

या कार्यक्रमात सुनील मोरे लिखित व दिशोत्तमा प्रकाशन प्रकाशित “इंग्लिश विंगलिश” या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

सुत्रसंचालन सुनील सोळंकी, प्रतिभा देवरे आणि विद्या राकडे यांनी केले. गुरुकुल फाउंडेशनचे युवराज कराड, तोतलेज कॉमर्स अकॅडमीचे सीए समीर तोतले, डेस्टिनी प्लॅनर्सचे योगेश बाहेती, डॉ. विशाल सुलाखे, डॉ. प्रमोद करोळे यांचे कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.

संघटनेचे खजिनदार रविंद्र पाटील, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, किशोर सपकाळे, अण्णासाहेब नरुटे, कैलास खताळे, वाल्मिक सानप, अशोक देशपांडे, किरण सूर्यवंशी, निलेश दूसे, सचिन अपसुंदे, विष्णू चव्हाण, महेंद्र कोरडे, सुनील आहेर, मयुर जाधव, दुर्गेश तिवारी, जयवंत जाधव, दीपक गुप्ता, आरती खाबिया-जैन, इम्रान पटेल आदी पदाधिकारी आणि शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link