प्रतिनिधी – संतोष लांडे | पुणे, दि. 5 जून 2025
‘मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने हडपसर रामटेकडी येथील नवयुग तरुण मंडळ समाज मंदिर परिसरात भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
या उपक्रमास एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय व श्री आकाश जयस्वाल यांची टेक्निशियन टीम यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराचे उद्घाटन अंगणवाडी सेविका सारिकाताई यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मधु ताराचे दिव्यांग प्रतिनिधी योगेशजी पांढरे, अशोकजी भिसे, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयातील मंजुषा कावळे मॅडम व वनिता बांगर मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले. मधु तारा पुणे शहराध्यक्षा शारदाताई शेंडकर यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमास पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाचे अधिकारी श्री रामदास धावडे, डॉ. महेश झीपरे, समाज मंदिराचे अध्यक्ष संतोष भाऊ, वानवडी क्षेत्रीय कार्यालय प्रमुख वर्षा वानखेडे मॅडम, रिक्षा संघटनेचे मधुकर यादव, दयावान सेवाभावी संस्थेचे प्रमुख सिद्धेश्वर कवडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
दीपगृह सोसायटीचे वृद्ध आरोग्य मित्र, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी आणि अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन उत्साह वाढवला. या प्रसंगी मधु तारा प्रमुखांना विठोबा-रुख्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली.
मधु ताराचे राज्यभर चालणारे कार्य समजावून सांगताना प्रमुखांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. हवामान अनुकूल झाल्यामुळे मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरानंतर गरजू वृद्ध नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलच्या व्हॅनने नेण्यात आले.








