एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक नियोजनावर भर द्या – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

प्रतिनिधी : सतिश कडु.

नागपूर, दि. ५ जून : नागपूर विधानभवनाच्या विस्तारीकरणात पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक नियोजनावर भर दिला जावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले. या कामाचा आढावा त्यांनी आज विधानभवनात घेतला.

या बैठकीत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले की, हेरिटेज इमारत कायम ठेवून त्याशेजारील उपलब्ध जागेत प्रस्तावित इमारतींचे नियोजन व्हावे. प्रस्तावित इमारती पर्यावरणपूरक असाव्यात व परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात यावे. रस्ते रुंद व सुलभ असावेत.

विस्तारीकरणाच्या पुढील टप्प्यासाठी २५ जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीसाठी सर्व आवश्यक माहिती व अहवाल सादर करण्याचे निर्देशही श्री. नार्वेकर यांनी दिले.

यावेळी त्यांनी राजस्थान विधानभवनात उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचा संदर्भ देत, नागपूर विधानभवन परिसरातही अशा संग्रहालयाची शक्यता तपासावी, असे सांगितले. एफएसआय आणि पुरातत्व विभागाच्या आवश्यक परवानग्यांचीही माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या.

विधिमंडळ परिसराची प्रत्यक्ष पाहणी

बैठकीनंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी नागपूर विधानभवनातील दोन्ही सभागृहे, मंत्रिदालने आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आणि कामात गती आणण्याचे निर्देश दिले.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link