एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

PCMC | कठीण परीस्थितीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याचा गुणगौरव

प्रतिनिधी : गोपाळ भालेराव.

चिंचवड: वूई टुगेदर फाउंडेशन नेहमीच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन जवेगवेगळे उपक्रम घेत असते. असाच एक उपक्रम म्हणजे!

अत्यन्त कठीण परिस्थितून 10 वी 12 वी मध्ये चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ यशस्वी क्लासेस हॉल चिंचवड येथे पार पडला.

यात पिंपरी चिंचवड मधील रात्रशाळा, श्रीराम विद्यालय,घरकाम करणाऱ्यांची मुले, काही सहारा नसलेली मुले,वॉचमेन,रिक्षा चालक,आदी घटकामधील गुणवंत विद्यार्थी निवडून त्यांचा आवश्यक वस्तू,देऊन सत्कार तर केलाच परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून जेष्ठ शास्रज्ञ .डॉ अशोक गोविंद नगरकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

डॉ.नगरकर यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन तर केलेच पण विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यामुळे विद्यार्थी अतिशय खुष झाले.

फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी कार्यक्रमाचे प्रास्थाविक केले.सलीम सय्यद यांनी फाउंडेशनची उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.

या उपक्रमास अनेकांनी मदत केली हे विशेष आहे. तसेच कार्यक्रमातील उपस्थितांनी स्वईच्छेने काही विद्यार्थ्यांना आर्थिक बक्षीसे दिली.

फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी प्रमुख पाहुणे जेष्ठ शास्रज्ञ यांचा परिचय करून दिला.

फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे उपाध्यक्षा सोनाली मन्हास,सचिव जयंत कुलकर्णी,सहसचिव मंगला डोळे – सपकाळे खजिनदार दिलीप चक्रे,सलीम सय्यद,संस्थापक क्रातिकुमार कडुलकर,सल्लागार रवींद्र सांगडे, दारासिंग मन्हास, जयंत राऊत, रवींद्र काळे, रवींद्र इंगळे, विलास गटने, शंकर कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, जगदीश खोडके, सौ खोडके, अनिल पोरे बाळासाहेब जगताप, अरविंद पाटील, परमानंद सोनी, खुशाल दुसाने, श्रीनिवास जोशी, दिलीप पेटकर, के रंगराव, सदाशिव गुरव, उदय कुलकर्णी, नंदकुमार वाडेकर, हनीफ सय्यद, उल्हास दाते, साधना बापट, भास्कर पाखले, रवींद्र शेटे, आसावरी बच्चे,

 

आदिनी कार्यक्रम यशस्वी करण्यास पुढाकार घेतला.

उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले सामुहीक राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link