एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारला, सेवानिवृत्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून स्वागत

पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारला, सेवानिवृत्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून स्वागत..!! नव्या आयुक्तांना पुणे जिल्ह्याचा दांडगा अनुभव

अंजली पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

 

पुणे महापालिका मा. महापालिका आयुक्त पदाचा पदभार मा. श्री. नवल किशोर राम (भा. प्र.से ) यांनी मा. डॉ.राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले, पुणे महापालिका महापालिका आयुक्त पदाचा पदभार श्री. नवल किशोर राम (भा प्र.से) यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले की पुणे महापालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळाली आहे तसेच सगळ्यांना बरोबर घेवुन काम करणार आहे, याप्रसंगी मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त उपआयुक्त व मा. खाते प्रमुख उपस्थित होते, भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 च्या तुकडीतील नवल किशोर राम हे (आयएएस) अधिकारी आहेत, ते मूळचे बिहार मधील असून 2007 मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते, आयएएस बनल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग नांदेडमध्ये झाली होती, त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर बीड आणि संभाजीनगर तर पुणे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते, कोविड महामारीच्या काळात पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम करीत असताना नवल किशोर राम नेहमीच प्रयत्नशील ठरले,

 

पुणे जिल्हाधिकारी पदावरून त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर बदली झाली होती नवल किशोर राम यांना पुणे जिल्ह्याची चांगलीच माहिती असल्यामुळे पुणे महापालिकेत ते नेहमीच प्रयत्नशील राहतील, सेवानिवृत्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे नागरिकांसाठी खुलेपणाने भेट देणारे, सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेणारे आणि मनमिळावू प्रशासन शैली जपणारे आयुक्त म्हणून त्यांची ओळख होती, त्यांच्या सेवापूर्तीनिमिंत्त महापालिकेत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे शहर अभियंता प्रशांत वाघमारे डॉ. राजेंद्र भोसले यांच्या पत्नी दिपाली भोसले आणि भोसले कुटुंबीय यावेळी उपस्थित होते, या कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुणे पालिकेतून आयुक्त पदावरून सेवानिवृत्त होत असलेले डॉ. राजेंद्र भोसले यांनी राज्यांत 25 ठिकाणी 32 वर्षे काम केले पुणे महापालिका आयुक्त म्हणून ते गेले सव्वा वर्ष काम करीत होते, सेवा भावी वृत्ती, कार्यतत्परता आणि जनहितासाठी असलेली तळमळ यासोबतच त्यांच्या प्रशासकीय नेतृत्वाची पुणेकरांना कायम आठवण राहील

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link