एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा ‘स्नेहबंध’तर्फे सत्कार

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा ‘स्नेहबंध’तर्फे सत्कार.

प्रतिनिधी- सारंग महाजन.

अहिल्यानगर – जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा स्नेहबंध फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सत्कार करून त्यांना उत्कृष्ट कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भंडारी हे पुणे येथील रहिवासी आहेत. ते यापूर्वी जमावबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे येथे कार्यरत होते. ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, मृद व जलसंधारण, पर्यावरण रक्षण व संवर्धन, स्वच्छ भारत अभियान, प्रशिक्षण व क्षमता बांधणी, विविध विकास योजनांची अंमलबजावणी, शासनाच्या विविध अभियानांची अंमलबजावणी आदी क्षेत्रात भंडारी यांनी भरीव काम केले आहे.
भंडारी यांना २०१८ मध्ये ग्रामविकास विभागाचा ‘गुणवंत अधिकारी पुरस्कार’ देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. त्यांना जिल्ह्यात नव्या वाटचालीसाठी डॉ. उद्धव शिंदे यांनी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link