एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नागपूर व अमरावती येथील क्रीडा व युवक सेवा उपसंचालक कार्यालयास प्रथम व द्वितीय क्रमांक

नागपूर व अमरावती येथील क्रीडा व युवक सेवा उपसंचालक कार्यालयास प्रथम व द्वितीय क्रमांक

प्रतिनिधी सतिष कडू नागपूर

100 दिवस कृती आराखडा उपक्रमात
उपसंचालक शेखर पाटील यांनी दोन्ही कार्यालयाचे केले नेतृत्व

नागपूर, दि.29 : 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत राज्यभर राबविण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात नागपूर व अमरावती येथील क्रीडा व युवक सेवा उपसंचालक
कार्यालयाने राज्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली महाराष्ट्रातील विभागीय स्तरावरील शासकीय कार्यालये- दुसरा टप्पा अंतर्गत नुकतीच नावे घोषीत करण्यात आली आहेत.

यात नागपूर व अमरावती येथील क्रीडा व युवक सेवा उपसंचालक कार्यालयाने साध्य केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

नागपूर येथील क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी यादृष्टीने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यांचे क्रीडा क्षेत्राविषयी असलेले व्हिजन नागपूर व अमरावती विभागात प्रत्यक्षात आणण्यासाठी उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कार्यालय कटिबद्ध असल्याचे यावेळी उपसंचालक शेखर पाटील यांनी आवर्जून नमूद केले .

ही जबाबदारी पुर्ण करतांना अमरावती येथील उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे असून दोन्ही कार्यालयांना तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून उत्कृष्ट काम करता आले. टीमवर्कमुळे राज्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक आम्हाला प्राप्त करता आला याचा मनस्वी आनंद असल्याची प्रतिक्रीया विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी दिली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link