एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; दोन महिलांची सुटका, मालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा

स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; दोन महिलांची सुटका, मालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा (प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे : वडगाव शेरीमधील आनंद पार्क येथे स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी कारवाई करून दोन महिलांची सुटका केली आणि स्पाच्या दोन मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; दोन महिलांची सुटका, मालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा (प्रतिकात्मक छायाचित्र)

 

पोलीस शिपाई वर्षा नामदेव सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्पाच्या व्यवस्थापक रिया रंजीत शर्मा (वय २१, रा. चंदननगर) यांच्यासह संदीप त्रिपाठी आणि राहुल जाधव या मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीमधील आनंद पार्क येथील शैलेश पार्क या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सृष्टी स्पा आहे. त्रिपाठी आणि जाधव हे दोघे मालक असून, व्यवस्थापक रिया शर्मा हिच्यामार्फत या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवित होते, अशी माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. पोलिसांनी बुधवारी (२८ मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. शर्मा हिच्यामार्फत जादा पैशांचे प्रलोभन दाखवून आरोपींनी दोन महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link