एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक घार्गे यांची ओळख : डॉ. उद्धव शिंदे.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक घार्गे यांची ओळख : डॉ. उद्धव शिंदे.

प्रतिनिधी -सारंग महाजन.

स्नेहबंध’तर्फे नूतन पोलीस अधीक्षकांचा सत्कार

अहिल्यानगर – लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची ओळख आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.

 

नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा डॉ. शिंदे यांनी सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक (नगर शहर) प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) वैभव कलुभर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व सर्व पोलीस अधिकारी पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, घार्गे यापूर्वी श्रीरामपूर येथे १ ऑगस्ट २००६ ते २२ जानेवारी २००९ या कालावधीत उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. घार्गे त्यांनी पोलीस दलाच्या अधुनिकीकरणावर मोठा भर दिला. रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस ठाणे बनवण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले. पोलीसांना अत्याधुनिक वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न केले. पोलीस प्रशासनाला लोकाभिमूख करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिस्तप्रिय आणि मितभाषी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या रुबाबदार, शैलीने गुन्हेगारीवर आळा घालतील असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link