एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महापुरुषांचा विचार ढणढनत ठेवायचा असेल तर चुल्हीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतिल…आ सिद्धार्थ खरात.

महापुरुषांचा विचार ढणढनत ठेवायचा असेल तर चुल्हीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतिल…आ सिद्धार्थ खरात.

प्रतिनिधी- सारंग महाजन.

समाजाचे कल्याण व उत्थान बाबासाहेबांच्या मार्गाने समाजाला उंच नेण्याचं काम हेच माझे ध्येय… आ सिद्धार्थ खरात

75 बौद्ध नव वधू वरांचा परिचय मेळावा संपन्न

बुलडाणा -: डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन बुलडाणा येथे यश सिद्धी सैनिक सेवा संघ, ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली , व रमाई च्या लेकीं समुहाच्या वतीने स्मृतीशेष रंगनाथ डोंगरदिवे (दादा साहेब)यांच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्ताने बौद्ध वधू वर परिचय मेळावा भरघोस प्रतिसादातून यशस्वी पणे संपन्न झाला, कार्यक्रम चे उदघाटन आमदार सिद्धार्थ खरात, मेहकर विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रम चे अध्यक्ष
कर्णल सुहास जतकर मा, संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र, तर प्रमुख मार्गदर्शक
ऍड, सुमित सरदार, मा जि, प, सदस्य,हे उपस्थित होते.

 

आमदार सिद्धार्थ खरात उद्घाटन प्रसंगी बोलत असताना म्हणाले की एछिक स्थळ मिळत नसल्याने समाजाचे अनेक वयस्कर मूल मुली अजून लग्नाचे बाकी असल्यामुळे बौद्ध वधू वर परिचय मेळावा सारखे सामाजिक कार्यक्रमाची आज खूप गरज आहे. तसेच यश सिद्धी सैनिक सेवा संघ व संस्थापक अनिल डोंगरदिवे यांच्या कार्य उल्लेखनीय असून त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे नाहीतर काही लोक निवृत्त होतात आणि घरात परिवारात गुंतून जात घरी बसतात जे जिवन्त आहेत ते स्वतः चळवळी ला समर्पित होतात असे समाजशील लोकांमुळे चळवळ आज जिवन्त आहे. यामुळे च आपला समाज प्रगती करू शकला जर प्रत्येक जण घरीच बसला तर ही चळवळ लयास जाईल, असं आश्वस्त मत व्यक्त करीत त्यांनी यश सिद्धी सैनिक सेवा संघ ने महार रेजिमेंट चा स्थापना दिवस साजरा केला, तसा कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही, इतका नियोजन बद्ध, शिस्त बद्ध कार्यक्रम फक्त यश सिद्धी सैनिक सेवा संघ च करू शकतो असे गौराउदगार व्यक्त केले, ते पुढे म्हणाले आपल्याला समता मुलक समाज निर्माण करायचा आहे, मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा पाईक आहे,आणि या विचारासाठी मी सदैव समर्पित राहील तसेच जिथे समाजावर अन्याय होईल तिथे सिद्धार्थ खरात पोहचेल असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कर्णल सुहास जतकर यांनी वधू वर परिचय मेळावा किती महत्व आहे याचे अनेक उदाहरण देऊन आपले मत व्यक्त केले. तसेच यश सिद्धी सैनिक सेवा संघ म्हणजेच एक चमत्कारिक संघ आहे, ज्या उपक्रम किंवा कार्यक्रमात यश सिद्धी सैनिक सेवा हाती घेतो तो कार्यक्रम यशस्वी होतोच, यश आणि यश सिद्धी सैनिक सेवा संघ हे एक समीकरण बनलं आहे, आजचा कार्यक्रम ही तसाच भरगच्च यशस्वी झाला, मी नेहमीच यश सिद्धी सैनिक सेवा संघा सोबत आहे असं मत ऍड सुमित सरदार साहेब यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम च्या दुसऱ्या सत्रात, वधू, वर यांचे बायोडाटा घेतलेल्या मुला मुलींनी आपला परिचय दिला, अश्या जवळ पास 75 विवाह इच्छुक मुला मुलींनी आपला परिचय दिला.
कार्यक्रम चे सूत्र संचलन मुख्य आयोजक अनिल डोंगरदिवे यांनी तर प्रास्ताविक ऋणानुबंध समाज विकास संस्थेचे प्रशांत डोंगरदिवे तर विलास बोर्डे यांनी आभार प्रदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा प्रदीप मघाडे, सिद्धार्थ मिसाळ, गुलाब मिसाळ,मधुकर खरे, विजय राऊत,गणेश साळवे,मदन बिबे,भारत जाधव, संजय ससाणे, विशाल घेवंन्दे,विलास जाधव, वामन खरात,कॅप्टन नंदकिशोर ढाकरके, कॅप्टन श्रीराम जाधव,विद्यासागर डोंगरदिवे,कॅप्टन रमेश भुसारी, दिलीप खिल्लारे,राजू पवार, बी जी मगर, समाधान मोरे,मधुकर जाधव,शंकर हिवाळे,बाबुराव साळवे,श्रीकृष्ण तायडे,मधुकर निकाळजे,शेषराव खरात,विलास बोर्डे,अनिल इंगळे, जोगदंड इत्यादीनी परिश्रम घेतले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link