भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन
प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
सोलापूर :बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या कारला लातूर-तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर ही घटना घडली असून गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडत चार वेळा पलटी झाल्याने हा अपघात गंभीर स्वरूपाचा ठरला. या दुर्घटनेत माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला आहे.
बेलकुंड येथील उड्डाणपुलावर हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांची कार भरधाव वेगात असताना नियंत्रण सुटल्याने ती स्लिप झाली. यामुळे गाडीने सुरक्षा कठडा तोडला आणि चार वेळा पलटी खात खाली कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि जखमी अवस्थेतील माजी आमदारांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूल वरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन झाले. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याचं दिसून येत आहे.
त्यामुळे, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आर टी देशमुख हे बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार होते. लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे त्यांच्या कारचा अपघात (Accident) झाला. अपघातानंतर त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण त्यांची प्राणज्योत मालवली.
