चैतन्य भाषा प्रसार व प्रचार मंडळ आणि श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे संस्कार वर्गाचे उद्घाटन.
प्रतिनिधी गणेश तारु
पूरग्रस्त वसाहत एरंडवणे गणेश नगर पुणे येथे चैतन्य भाषा प्रसार मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ अनिता बल्लाळ बडवे जोशी यांच्या हस्ते तसेच ढोल ताशा पथक संघाचे अध्यक्ष श्री पराग ठाकूर तसेच श्री पियुष शहा यांच्यातर्फे वासंती संस्कार वर्गाचे उद्घाटन झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते संस्कार वर्गाचे महत्व सांगताना सौ अनिता जोशी यांनी आई वडिलांचे महत्त्व आजी-आजोबांचे महत्त्व . शुभंम करोतिचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमाला सौ.वेदिका जोशी सौ.अरुणा कांगणे या उपस्थित होत्या
