वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांना व्यवसाय मार्गदर्शन
संपादकीय
वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशन व मलाबार गोल्ड अँड डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने सेफ शॉपचे डायमंड व लाखो यशस्वी उद्योजकांचे प्रेरणास्थान महागुरूजी रामदास शेळके सर यांचे मार्गदर्शन मलाबार गोल्ड अँड डायमंड लक्ष्मी रोड येथे आयोजित केले होते. यावेळेस सरांनी मार्गदर्शन करताना व्यवसायात व जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर टीम वर्क, मेहनत, सातत्य, विश्वास आणि संयम यांची आवश्यकता आहे असे सांगितले. तसेच उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत न थांबता व हार न मानता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. झिरोतून हिरो कसे बनता येईल याचे उत्कृष्ट मार्गदर्शन सरांनी सर्वांना केले. महागुरूजी रामदास शेळके सरांनी आजपर्यंत लाखो लोकांना उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देऊन जीवन प्रकाशमय केले आहे तसेच लाखो घरापर्यंत भागवतगीता, संपूर्ण रामायण व संपूर्ण हनुमान हे अध्यात्मिक ग्रंथ पोहचवून उत्कृष्ट अध्यात्मिक कार्य पण करत आहेत.
असंख्य महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. संस्कृती म्हम्हाणे हिने नृत्य व गायक बाबुराव सुगंधी यांनी सुरेल आवाजात गाणी सादर करून सर्वांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते रजनी पाचंगे, मीना मोरे, मंगल नागुल, उषा घोगरे, राजेंद्र भवाळकर, उज्वला झेंडे, भाग्यश्री भिसे, आरती पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या मार्केटिंग हेड दीक्षा देसाई तसेच सेफ शॉप कंपनीचे उज्वला भोसले, भारती पवार, राजू कुंवर, जीवन अभंग व प्रज्ञेश गोसावी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा योगिता गोसावी यांनी केले होते.
