घटनाबाह्य असलेल्या सचिव निलाबाई जाधव यांचे सदस्यत्व रद्द करून जनता शिक्षण प्रसारक मंडळाचा फेरफार अर्ज धर्मादाय उपायुक्त त्यांनी रद्द केला
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सखाराम कुलकर्णी
नांदेड- जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेचा २०१५ चा फेरफार अर्जाचा निकाल दहा वर्षानंतर लागून संस्थेत सचिव पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या निलाबाई जाधव या घटनाबाह्य सदस्य झाल्या म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द केले व शिवाजी जाधव यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर फेरफार अर्ज दाखल केलेला २८२/१६ चा फेरफार अर्ज धर्मादाय उपायुक्त श्रीमती ममता राखडे यांनी रद्द केल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालामुळे शिवाजी जाधव यांचे संस्थेतील साम्राज्य संपुष्टात आले.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड संस्थेचा फेरफार अर्ज सन २०१६ मध्ये मंजुरीसाठी धर्मादाय उपायुक्त नांदेड यांचे न्यायालयात दाखल झाला होता. अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी २०१२ मध्ये आपला मुलगा रवी जाधव, पत्नी कमलबाई जाधव, नातेवाईक अश्विन क्षीरसागर, सिध्दांजी सूर्यवंशी, लक्ष्मण बिरादार यांना सदस्य केले होते. तर २०१० ते १५ च्या कार्यकारणीत सरचिटणीस असलेल्या निलाबाई या घटनाबाह्य सदस्य होत्या. नीलाबाई संस्थेच्या शाळेत शिपाई पदावर आहेत. संस्थेच्या घटनेनुसार सदस्य व संस्थेतील कोणत्याही पदावर नौकरीवर राहता येत नाही. घटनेतील या मुद्द्यावर धर्मादाय उपायुक्त ममता राखडे यांनी निलाबाईला अपात्र ठरवले. निलाबाई अपात्र झाल्यामुळे त्यांनी बोलावलेल्या बैठका व त्यांच्या कार्यकाळातील नवीन सदस्य झालेले रवी जाधव, कमलाबाई जाधव, अश्विन क्षीरसागर, सिध्दांजी सुर्यवंशी, लक्ष्मण बिरादार यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्याचबरोबर १९९३ ला अजीव सदस्य झालेले सखाराम कुलकर्णी यांनी १९९३ ते २०१८ पर्यंत बैठकीला उपस्थित नव्हते. संस्थेची प्रवेश फी १ रुपया भरली नसल्यामुळे कुलकर्णीला अपात्र असल्याचा निर्णय दिला. फेरफार अर्ज क्र. २८२/१६ हा दहा वर्ष चालला व अटीतटीत महत्त्वपूर्ण निकाल लागल्यामुळे संस्थेत आता फक्त सात सदस्य राहिलेत. गैर अर्जदार असलेले अशोक जाधव यांचे सदस्यत्व कायम राहिल्यामुळे पुढील निवडणुकीला वेगळेच वळण येईल. अपात्र झालेले सखाराम कुलकर्णी यांनी धर्मादाय सह आयुक्त यांचे कडे अपील केले. या प्रकरणात अर्जदार शिवाजी जाधव यांचे कडून अॅड. एस.एम. पुंड गैर अर्जदार सखाराम कुलकर्णी यांचे कडून अॅड. व्हि.बी.पोकळे तर गैरअर्जदार अशोक जाधव यांचे कडून अॅड. अरुण फाजगे यांनी युक्तिवाद केले होते.
