रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने उपायुक्त संदीप खलाटे यांना निवेदन सादर,
रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग गोडाऊन मध्ये चालणारा काळाबाजार तत्काळ थांबून अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासंदर्भाचे निवेदन पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांना रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्या हस्ते देण्यात आले,
यावेळी रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे पुणे शहर खजिनदार सुनील राठी, विजय वरछावे, गोकुळ चराटे, रमेश बडगे, शालिग्राम सरासरे, चिंतामण बहिरे, आदी यावेळी उपस्थित होते,
सदर निवेदन मध्ये खराडी भागातील अतिक्रमण विभागात गोडाऊन असताना अतिक्रमण विभागा अंतर्गत नगर रोड वरील पथविक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे या कारवाई मधील उचललेला माल हातगाडी स्टॉल हे अनधिकृत पद्धतीने तत्काळ सोडवण्यात येत आहे या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आमच्या संघटने मार्फत आपल्या कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांनी दिला,
