शंकर जोग : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांचे आज स्मुर्ती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ताडीवाला रोड माता रमाई चौक आनंद सवाणे यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये स्व राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी आनंद सवाणे यांनी सांगितले राजीव गांधी यांची प्रेरणा घेऊन युवकांमध्ये राष्ट्रप्रेम भावना वाढवावी त्यांनी देशासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून युवकांनी राजकारणात येऊन देशाचे सेवा करावी असे मत व्यक्त केले,
यावेळी चंदन कुमार साह, अजित वाडी, शिवानंद कवडे, मोहम्मद सितारे, महेंद्र कांबळे, शंकर बिराजदार, आदि यावेळी उपस्थित होते
