सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्र रत्न पुरस्काराने अशोक पाटील सन्मानित
प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
पुणे: १४ मे २०२५ रोजी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे आध्यात्मिक गुरु मा. श्री श्री १००८ महामंडलेश्वर परमहंस कृष्णानंद कालीदास बाबाजी हरियाणा भारत यांचे हस्ते श्री अशोक पाटील(संस्थापक व अध्यक्ष – मातृभूमी सोशल फौंडेशन पुणे ) यांना सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्र रत्न पुरस्कार (बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन ) यांचा वतीने देण्यात आला.
अशोक पाटील हे सामाजिक क्षेत्र तसेच उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहेत झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य अशा विविध सामाजिक संघटना वरती पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे.
हा कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड पुणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचा वेळेस मा. डॉ .अविनाशजी सकुंडे (आंतरराष्टीय अध्यक्ष मानवाधिकार राजदूत संघटना ), मा. तृप्तीताई देसाई (संस्थापक व अध्यक्षा – भूमाता ब्रिगेड), डाँ.महेश थोरवे सर (डायरेक्टर एम आई टी ग्रुप ), मा.दीपक राजे शिर्के (राज्यप्रमुख राष्टवादी सैनिक सेल महाराष्ट्र ), मा. रवींद्र अग्रवाल (लायन्स क्लब ), मा. श्री सपकाळजी (सरचिटणीस शिव आरोग्य सेना महाराष्ट्र ) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .
या पुरस्काराने अशोक पाटील यांना त्यांचे सहकारी, मित्र मंडळी व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
