अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
मॉर्निंग वॉक करणाकरणामहिलेचे दुचाकीवरुन येवुन मंगळसुत्र हिसकावणारा गुन्हेगार १२ तासात सहकारनगर पोलीसां कडुन जेरबंद
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव पुणे
२.५०,०००/- किंमतीचे २ तोळे सोने व एक दुचाकी गाडी जप्त करून चैन चोरीचा गुन्हा उघड
प्रतिनिधी:संतोष लांडे
सहकारनगर(पुणे):दि.१६मे २०२५ रोजी सकाळी ०६.०० वा.च्या सुमारास फिर्यादी हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिरा जवळ धनकवडी पुणे येथे सार्वजनीक रोडवर फिर्यादी महिला मॉर्निंग वॉक करीत असताना, एका दुचाकी गाडीवरून एक अनोळखी इसमाने त्यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले त्या बाबत अनोळखी चोरटया इसमाविरूब्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१९०/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४.३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावरुन गुन्हा केलेला आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलवरी वाँय म्हणनु फिरत असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारा इसम हा गणेश चौक, आंबेगाव पठार, पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत असुन त्याने अंगामध्ये काळे पिवळे रंगाचा हाफ बाहीचा टी शर्ट व निळे रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन पाहता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असलेला दिसला. त्यास संशय येताच तो तेथुन पळुन जावु लागल्याने त्यांना सोबतचे स्टाफचे मदतीने थोड्याच अंतरावर पकडुन ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) अमोल किसन नाकते वय २७ वर्षे सध्या रा. समता कॉलनी, प्रेरणा शाळेमागे, गणेश चौकाजवळ आंबेगाव पठार पुणे मुळ रा. मु. पिंपरी पोस्ट गुंजवणे ता. वेल्हा जि. पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता मी सकाळी दुचाकी गाडीवरून आंबेगाव पठार धनकवडी भागात स्विगीचे डिलवरी बॉय म्हणनु फिरण्याचा बहाणा करीत असताना एक वयस्कर महिला रस्त्याने चालत होती त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून मी तेथून पळून गेलो असे सांगितले. सदर गुन्हाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१९०/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४,३०९ (६) हा गुन्हा उघडकीस आला असुन सदर आरोपी कडुन एकुण ९०,०००/- रूपये किंमतीचे २ तोळे सोने व गुन्हा करतेवेळी चापर केलेली एक दुचाकी गाडी किमंत रुपय ६०,०००/- रुपये व सदर सोने गहाण ठेवून मिळालेली रक्कम १,००,०००/- रुपये असा एकुण २,५०,०००/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक २०/०५/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली असुन अधिक तपास सहकारनगर पोलीस ठाणेकडील सपोनि सागर पाटील हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सोो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. मनोज पाटील सो. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सस्रो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बाधु खुटवड, पोलीस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले, प्रदिप रेणुसे, महेश भगत, बजरंग पवार, आकाश किर्तीकर, खंडू शिंदे, अमित पदमाळे, मारोती नलवाड यांनी केली आहे.
