प्रतिनिधी : गोपाळ भालेराव | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज .
पुणे :भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पू. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेण्या बाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, किरण साबळे हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपी नाव. चेतन राजु जाधव व गणेश दत्तात्रय जगदाळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस, स्टेशन हद्दीतुन रिक्षा व दुचाकी गाड्या चोरी करुन त्या आंबेगाव पठार, शिव कॉलनी, पुणे येथील मोकळया जागेत लावल्या आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आंबेगाव पठार, शिव कॉलनी येथे जावुन पाहणी केली असता तेथे आरोपी नाव १) चेतन राजु जाधव, वय २५ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०१, सुरज दर्शन सोसायटी, राजगड व्हिलाजवळ, आंबेगाव पठार, पुणे २) गणेश दत्तात्रय जगदाळे, वय २६ वर्षे, रा. धनकवडी, आंबेगाव पठार, पुणे हे मिळून आले असता त्यांची कसून चौकशी करुन त्यांच्या कडुन २ तीन चाकी रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त केली असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
1). भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २३६/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३.२)२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंचर २३८/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)३). भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ११८/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) त्या दोन्ही आरोपीना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सारे, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील परिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे, सचिन सरपाले, मंगेश पवार, महेश बारयकर, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.
