एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पहाटेच्या वेळेस रिक्षामधून येवून मोबाईल चोरी करणारे दोघे हडपसर पोलिसांच्या ताब्यात

पहाटेच्या वेळेस रिक्षामधून येवून मोबाईल चोरी करणारे दोघे हडपसर पोलिसांच्या ताब्यात

तिन मोबाईल व रिक्षा असा तिन लाखाचा माल केला जप्त

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव

हडपसर:(पुणे) दिनांक 3 मे 2025 रोजी हडपसर पोलिसांना केली मोठी कार्यवाही फिर्यादी हे दिनांक २७ मार्च २०२५ रोजी पहाटे ०५:३० वा. च्या सुमारास हडपसरच्या दिशेने कामानिमीत्त फोनवर बोलत जात असताना ससाणे नगर कडुन हडपसरच्या दिशेने येणा-या काळया रंगाच्या रिक्षातील मागे बसलेल्या एका इसमाने फिर्यादी यांचा मोबाईल खेचून जोरात हडपसरच्या दिशेने निघुन गेले. फिर्यादी यांचे सारखेच इतर २ इसम यांचे देखील मोबाईल चोरी गेल्याने त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र. नं ४१५/२०२५ भा.न्या.सं.३०४.३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संजय मोगले, आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.निलेश जगदाळे, यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार अमित साखरे, तुकाराम झुंजार, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांचे पथक काम करीत असताना, त्यांनी गुन्ह्याचे घटनास्थळ असलेले मागातील सीसीटीव्ही फुटेज पाहीले. प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व त्याआधारे मिळालेली उपयुक्त माहीती याचे आधारे रेकॉर्ड वरिल आरोपी नाव १) विजय ऊर्फ खंडया खंडु सरोदे वय १९ वर्षे रा. ढोरे पेट्रोल पंपाच्या समोर, हरपळे वस्ती, फुरसुंगी पुणे व १ विधीसंधर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून किं.रू ५०,०००/-चे तिन मोबाईल फोन व गुन्हा करताना वापर केलेली रिक्षा असा किं. रू ३,००,०००/- असा माल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे.गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली रिक्षा ही चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं ७५/२०२५ भा.न्या. संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिपक कांबळे हे करीत आहेत.आरोपी विजय ऊर्फ खंड्या खंडु सरोदे याच्या कडून खालील गुन्ह्यात पाहीजे असलेला आरोपी आहे.
१) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४१५/२०२५ भा.न्या.सं.३०४.३ (५) (गुन्हा उघडकीस)
२) फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं ७५/२०२५ मा.न्या. सं.कलम ३०३ (२) (गुन्हा उघडकीस)
३) फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं १७५९/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५,३३१, (३) (४) (पाहीजे आरोपी) ४) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं ५४३/२०२४ भा.न्या. संहिता कलम ३०३ (२) (पाहीजे आरोपी)सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. डॉ. राजकुमार शिंदे यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पो. अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे यांचे पथकाने केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link