एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी

पादचाऱ्याचे मोबाईल हिस्कावणाऱ्या आरोपीकडुन १,९०,०००/- रुपये किंमतीचे ६ मोबाईल फोन व १ दुचाकी गाडी जप्त.

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी

प्रतिनिधी: डॉ.गणेश राऊत

पुणे :आज दिनांक 5 मे 2025 रोजी भारती विद्यापीठ पोलिसांनी दमदार कामगिरी करत. गुन्हेगारांना अटक करण्यात आली.
दिनांक ०१मे २०२५ रोजी रात्री ०८.०० वा चे सुमारास गुजरवाडी फाटा, महेश कदम यांच्या बंगल्याजवळील गोल्डन स्क्रैप सेंन्टर या दुकानाचे पुढील बाजूच्या रोडवर फिर्यादी हे फोनवर बोलत असताना दुचाकी गाडीवरील दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यापैकी गाडी चालविणारे इसमाने फिर्यादी यांना पत्ता विचारण्याचा बहाण करुन गाडीचे मागील बाजुस बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिस्काचुन चोरी केला आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २३०/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना मोबाईल चोरांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गुन्हेगार सदरचा गुजरवाडी येथे राहणारे रोहीत सुरेश कांबळे, सलमान शेख यांनी केला असल्याची बातमी मिळाली. त्यांचा शोथ घेत असताना त्यातील रोहीत सुरेश कांचळे, वय १८ वर्षे ६ महीने, रा. जाधव नगर, जाधव यांचे बिल्डींगमध्ये भाडयाने,गुजरवाडी फाटा, कात्रज, पुणे हा भारतनगर येथे मिळून आल्याने त्याचेकडुन १,००,०००/- रुपयेची ज्युपीटर दुचाकी गाडी क्रमांक MH12PM5902 व ९०,०००/- रुपये किंमतीचे ६ मोबाईल जप्त केले आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्याचेकडुन जप्त केले मोबाईल फोन व दुचाकी गाड्यांबाबत तपास चालु आहे.सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सारे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु.साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link