प्रतिनिधी सारंग महाजन : शिवशांती फिल्म्स् प्रोडक्शन पुणे यांचेकडून “तुझी नि माझी प्रीत “ह्या वेब सिरीजचे नुकतेच पिंपरी धुमाल आणि रांजणगाव ह्या परिसरामध्ये नुकतेच चित्रीकरण पार पडली असून याचे लेखन सुरेश चव्हाण कालगावकर यांनी केले असून दिग्दर्शनाची जबाबदारी श्री अर्जुन नोटके, सहदिग्दर्शक विजय कट्टे यांनी सांभाळलेली आहे तर निर्माता गंगेश्वर सोनवणे, राजू सांगळे व पूजा विश्वकर्मा आहेत कॅमेरा उमेश पाटील प्रोडक्शन गुलाब फुलमाळी व संदेश लोखंडे तसेच ह्या वेब सिरीजचे मुखडा गीत समीना शेख व संदीप रोकडे यांनी गायले असून संगीत आदेश वारे यांचे आहे. ह्यातील प्रमुख भूमिकेत सुनीलजी गोडबोले, सुदेश बलिद, याशिवाय पुणे परिसरातील अनेक कलाकारांनी भाग घेतलेला आहे या वेब सिरीज मधून गरीब आणि श्रीमंत ह्यातील दरी कमी करताना निर्माण झालेला संघर्ष आणि ह्यातुन निर्माण झालेलं प्रेम समाजाकरता एक चांगला संदेश देईल.
ही वेब सिरीज शिवशांती फिल्म्स् प्रोडक्शन या यूट्यूब चैनल वर आपल्याला बघायला मिळेल.
